आंगणेवाडीत आज ५ मार्च रोजी ‘श्रीमंत दामोदरपंत’ नाट्यप्रयोग!

मसुरे,दि.५ मार्च(झुंजार पेडणेकर)

आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी रंगमंच येथे मंगळवार ५ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता केदार शिंदे लिखित ‘श्रीमंत दामोदरपंत’ हे नाटक होणार आहे. दिग्दर्शन महेश सावंत पटेल, नेपथ्य तारक कांबळी आणि बंधू रेवंडी यांचे आहे. आंगणेवाडी नाट्य मंडळ मुंबई यांच्या वतीने सादर होणाऱ्या नाटकामध्ये संतोष आंगणे, स्वप्निल आंगणे प्रसाद नरेश आंगणे, मृण्मयी साने, हिमांगी सुर्वे, अक्षता मोरे, निशिकांत आंगणे, संकेत आंगणे आणि प्रतीक आंगणे हे भूमिका साकारणार आहेत. उपस्थितीचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे.