मालवण,दि.५ मार्च
रौप्य महोत्सवी सिंधुदुर्ग सहकारी बँक लि. मुंबई बँकेला २५ वर्ष पूर्ण झाल्याने बँकेचा रौप्य महोत्सव
दिनांक ६ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजता कोहिनुर हॉल दादर सेंट्रल रेल्वे स्टेशन (पूर्व), मुंबई ४०० ०१४ या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी सहकार क्षेत्रातील नामवंतांच्या उपस्थितीत बँकेचे हितचिंतक, ठेवीदार, कर्जदार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी सहकार क्षेत्रातील नामवंत मंडळींकडून बँकेप्रति मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबै बँक अध्यक्ष तसेच आमदार श्री. प्रवीण दरेकर, मुंबै बँक संचालक आमदार प्रसाद लाड, अपना बँक व्यवस्थापक मंडळ अध्यक्ष दत्ताराम चाळके, नितीन काळे, शिवाजीराव नलावडे, संदिप घनदाट उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष हरिष परब, उपाध्यक्ष जयवंत नरसाळे व सर्व संचालक मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.