आंगणेवाडी येथे उभारण्यात आलेल्या शिवसेना स्वागत कार्यालयास भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट

मालवण,दि.५ मार्च
आंगणेवाडी श्री भराडी देवी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आंगणेवाडी येथे उभारण्यात आलेल्या शिवसेना स्वागत कार्यालयास भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट दिली. यावेळी तालुकाप्रमुख राजा गांवकर यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. भाजप निलेश राणे हेही उपस्थित होते.

राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी युती सरकार आहे. त्याच धर्तीवर मालवण येथेही भाजप शिवसेना पदाधिकारी यांचा चांगला समन्वय आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे शिवसेना कार्यालय येथे उस्फुर्त स्वागत करण्यात आले.

यावेळी शिवसेना कुडाळ मालवण क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, उपाजिल्हा प्रमुख विश्वास गांवकर, महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, उपजिल्हा प्रमुख निलम शिंदे, पराग खोत, हर्षद पारकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते