वेंगुर्ला,दि.१४ जानेवारी
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची सभा भंडारी भवन सावंतवाडी येथील कै. सहदेव मांजरेकर सभागृहात जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी महासंघाने काढलेल्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले.
प्रसाद आरावंदेकर यांची सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी नेमणूक झाल्याबद्दल तर जिल्हा परिषदेच्या पुरस्कार प्राप्त झालेल्या शामल मांजरेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर, प्रसाद आरावंदेकर, सचिव विकास वैद्य, खजिनदार लक्ष्मीकांत मुंडये, भाई कांबळी, संजय खडपकर, सुनील नाईक, श्रीकांत नाईक, दिवाकर म्हालवणकर, मोहन गवंडे, विलास आसोलकर, दिलीप पेडणेकर, निलेश गोवेकर, जयप्रकाश चमणकर, श्री.आळवे , श्री.पालयेकर, गुरुनाथ पेडणेकर, देविदास आडारकर, राजेंद्र बिरजे, गुंडू वाडकर, हनुमंत पेडणेकर, शितल नाईक, देवता पेडणेकर, गुरुदास पेडणेकर, संतोष वैद्य, समता सूर्याजी, लक्ष्मी सावंत, संजय पिळणकर,
नंदकिशोर कोंडये, नामदेव साटेलकर, दिपक जोशी, सिद्धार्थ पराडकर, मदन पार्सेकर, संगीता हडकर, प्रियांका आदी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.