बांदा येथे दासनवमी उत्साहात साजरी

बांदा,दि.५ मार्च

बांदा येथील श्री विठ्ठल मंदिरात श्री रामदास नवमी चा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.यानिमित्तान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी श्री विठ्ठल रखृमाई पूजा तसेच
श्री समर्थ रामदास स्वामींच्या प्रतिमेचे पूजन होउन दर्शनास आरंभ झाला. त्यानंतर श्री राम नामाचा जप करण्यात आला. नैवेद्य,आरती करून
महाप्रसादास सुरूवात झाली.
सायं आरती नंतर स्थानिकांच्या भजनसेवेचे आयोजन करण्यात आले होते
भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.