आचरा ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी 11 मार्च रोजीआरोग्य शिबीर

आचरा,दि.५ मार्च(अर्जुन बापर्डेकर)
पंचक्रोशीतील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सोमवार दिनांक ११ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मांगल्य मंगल कार्यालय आचरा येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे . या शिबीरात दिव्यांगाची सर्व प्रकारचीस तपासणी करण्यात येणार आहे तर ज्येष्ठांची नेत्र व रक्त तपासणी होणार आहे या शिबीरात सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल व जिल्हा व्यंग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग व जिल्हा परिषद आरोग्य विभाग सिंधुदुर्ग व न्युरोसिनॅपिक कम्युनिकेशन कंपनी बंगलोर अत्याधुनिक हेल्थ केअर सेंटर टेलीमेडीसीन सिंधुदुर्ग आणि विवेकानंद नेत्रालय कणकवली यांचे सहकार्य मिळणार आहे या शिबीरात ग्रामपंचायतीतर्फे सकाळचा नाष्टा व दुपारचे जेवण देण्यात येणार आहे. नांव नोंदणीसाठी ९८९०६९९७२० ७०३०५७२३०३ व ९४२११४४३५९ या नंबर वर शनिवार दि ८ मार्च दुपारी २ वाजेपर्यंत संपर्क करावा असे आवाहन सरपंच जेरोन फर्नांडिस व उपसरपंच संतोष मिराशी यांनी केले आहे .