मालवणात शेगावनिवासी श्री गजानन महाराज यांच्या १४६ प्रकट दिन विविध कार्यक्रमानी साजरा ; भाविकांची अलोट गर्दी

मालवण,दि.५ मार्च
शेगावनिवासी श्री गजानन महाराज यांच्या १४६ व्या प्रकट दिनाचे औचित्य साधून मालवण एसटी स्टॅंड नजीकच्या श्रीराम मंदिर येथे श्री गजानन महाराज शेगाव यांचा प्रकटदिन सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री गजानन महाराज भक्त मंडळ मालवण यांनी सादर केलेल्या गजानन महाराज विजय ग्रंथामधील कोरड्या विहिरीत पाणी आले हा चलचित्र देखावा लक्षवेधी ठरला तर श्री दत्त माऊली पारंपरिक दशावतार लोककला नाट्यमंडळ सिंधुदुर्ग यांचा ट्रिकसीनवर आधारीत पौराणिक स्वामी अन्नपूर्णा हा दशावतारी नाट्य प्रयोगही उपस्थितांनी दाद दिली

मालवण एस टी स्टॅन्ड नजिकच्या श्रीराम मंदिर व प्रांगणात श्री. गजानन महाराज, शेगांव यांच्या प्रकटदिन सोहळ्याचे औचित्य साधून विविध कार्यक्रम संपन्न झाले. सकाळी सनई चौघड्याने प्रकटदिनाच्या कार्यक्रमास प्रारंभ झाल्यानंतर श्री गजानन विजय ग्रंथाचे साखळी पारायण करण्यात आले तर सकाळी ८ वाजता श्री गजानन महाराजांची महापूजा बांधण्यात येऊन पूजाअर्चा करण्यात आली .दुपारी १२ वाजता आरती व नैवेद्य कार्यक्रम झाला. दुपारी १ वाजल्यापासून झुणका – भाकरी प्रसादाचा कार्यक्रम पार पडला तसेच संध्याकाळी ४ वाजल्यापासून तीर्थ प्रसाद वाटप सुरु झाले आणि ५ वाजता अष्टपैलू कला निकेतन, मालवण यांचे भजन सादरीकरण झाले. रात्री साडे आठ वाजता श्री गजानन महाराज भक्त मंडळ मालवण निर्मित प्रफुल्ल देसाई दिग्दर्शित गजानन महाराज विजय ग्रंथामधील अध्याय पाचवा कोरड्या विहिरीत पाणी आले हा चलचित्र देखावा सादर करण्यात आला यामध्ये श्री गजानन महाराज यांची भूमिका रामचंद्र उर्फ गोट्या चिरमुरे यांनी तर भास्कर पाटील यांची भूमिका हेमंत कांदळकर यांनी केली सहकलाकार म्हणून नेहा हडकर,रुचिता हडकर, प्रांजल कवटकर,सिद्धी सामंत, नेहा सुतार यांनी काम केले या चलचित्र देखाव्यासाठी ऍड अक्षय सामंत, शरद कांबळी, विलास देऊलकर, दिनेश किडये, धनेश हडकर, तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले तर श्री दत्त माऊली पारंपरिक दशावतार लोककला नाट्यमंडळ सिंधुदुर्ग यांचा ट्रिकसीनवर आधारीत पौराणिक स्वामी अन्नपूर्णा हा दशावतारी नाट्य प्रयोगही उपस्थितांनी दाद दिली यावेळी प्रकटदिन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडणाऱ्या सर्वांचे मंडळाचे अध्यक्ष श्री प्रभाकर देऊलकर यांनी आभार मानले आहेत