देवगड,दि.५ मार्च
लिंगडाळतिठा दहीबांव मार्गावर लिंगडाळगाव येंथे भरधाव वेगाने मोटरसायकल चालवुन समोरून येणा-या चारचाकी वाहनास धडक देवून स्वत:चा व मोटरसायकलवर मागे बसलेल्या दुसèया व्यक्तीच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी देवगड पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मोटरसायकलस्वार दिप रंजीत तिरूआ(रा.पाटथर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहीतीनूसार, मोटरसायकलस्वार दिप रंजीत तिरूआ हा मोटरसायकलने सोबत असलेल्या निर्मल याच्यासहीत लिंगडाळ तिठा दहीबांव मार्गावरून भरधाव वेगाने जात असताना लिंगडाळ गाव येथे सोमवारी सकाळी १० वा.सुमारास समोरून येणा-या ट्रकला धडक देवून झालेल्या अपघातात दोघांच्याही गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नरेश रंजीत तिरूआ यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवगड पोलीसांनी मोटरसायकलस्वार दिप रंजीत तीरूआ याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.