कणकवली दि.५ मार्च(भगवान लोके)
जानवली परबवाडी परिसरातील जंगलमय भागात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या स्थितीतील मृतदेह आढळून आला आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघड झाला. पोलिस पाटील मोहन सावंत यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील व अन्य पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाची ओळख पटण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. मात्र, मंगळवारी रात्री मृतदेहाची ओळख पटली नव्हती. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक वृषाली बरगे करीत आहेत.