ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यातील जनतेला कधीही परिवार मानले नाही -आम.नितेश राणे

पाटणकर कुटुंब सोडून दुसऱ्या कोणाला ठाकरें परिवार मानतच नाहीत

कणकवली दि.५ मार्च(भगवान लोके)

संजय राऊत यांचा मालक उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र राज्यातील जनतेला कधीतरी आपला परिवार मानला का?पाटणकर परिवार सोडून दुसऱ्या कोणाला परिवार मानलं का? ते ठाकरे सरकार नहोत तर पाटणकर सरकार होत.सगळं काही पाटनकरांसाठी हे घोष वाक्य होत. संजय राऊत चा परिवार कोणता हे सुध्दा जनतेला कळुदेत तो परिवार भारतीय आहे की रशियात आहे ते जाहिरात करा अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.

कणकवलीत पत्रकारांशी ते बोलत होते.
काल मोदींजींनी भारत देशाचा नागरिक आपला परिवार असल्याची भावना व्यक्त केली. त्यावर देशभर मोदींचा आम्ही परिवार आहोत अशी घोषणा,आणि स्टेटस ठेवले गेले. त्यामुळे संजय राऊत ला मिर्ची लागली आहे.२०१४,२०१९ च्या प्रत्येक निवडणुकीत याच ठाकरे,राऊत यांनी मोदी परिवाराचा फायदा घेतला.

दिशा सालीयन केस मधून माझ्या मुलाला वाचवा अस सांगत लोटंगण घालत आहेत ते सुद्धा स्वतःच्या परिवारासाठी जनतेसाठी ठाकरेंचे काहीच नाही.लोक स्वतःहून आम्ही मोदी परिवार बोलत आहेत त्यावर टीका करायला संजय राऊत यांना लाज वाटली पाहिजे . मणिपूर विषयी बोलण्यापूर्वी पत्राचाळ मधील माणसांना आपला परिवार माना आणि त्यांना भेट द्या,असे आव्हान नितेश राणे यांनी दिले.
आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटणार कधी याबाबत संजय राऊत ने किती तारखा दिल्या आहे.ह्यांची भांडण कमी होत नाहीत. मतदानानंतर देखील ह्यांची भांडण मिटणार नाहीत.केवळ ४,५ जागा देणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबाचा फार मोठा अपमान आहे.छत्रपती संभाजी महाराज खासदारकी साठी आग्रही होते.त्यांच्या घरात सुरुंग शकुनी मामा ने लावला का? याबाबत शाहू महाराज यांचे मत फार महत्वाचे आहे.

सुषमा अंधारे स्टूल,फर्निचर सकट जिल्ह्यात का आलेल्या होत्या. तुमची सह राक्षसांची तोंडे बंद आहेत म्हणून की तुमच्यावर विश्वास नाही म्हणून.गोव्याचे मुख्यमंत्री भाजपाचे नेते आहेत. त्यामुळे ते मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत.पूर्वी कै. मनोहर पर्रीकर येत असत.गोव्यात तुमचा ग्रामपंचायत सदस्य तरी निवडून येणार आहे काय ? असा सवाल नितेश राणे यांनी केला.

१० वर्षात विनायक राऊत याने काहीच केले नाही. त्यामुळे १० वर्षाचा लेखाजोखा काळा असेल. प्रत्येक पानावर राणे कुटुंबीयांचा फोटो लावावा. कारण राणे यांचेवर टीका करण्यापलीकडे तुम्ही काहीच केले नाही हे जाहीर आहे.आमच्या कार्यालयात वैभव नाईक नवीन चहा बनवायला ठेवलं आहे. त्यामुळे त्याला आमच्यात काय होत ते समजत असावे अशी टीका केली.
लालू यादव यांनी स्वतःच्या कुटुंबा पलीकडे कोणताही विचार केला नाही. त्यांनी मोदींवर बोलू नये. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात कोणाला कसा न्याय द्यायचा हे अमित शहा यांना माहीत आहे. त्यांच्या दौऱ्यामुळे आम्हाला बळकटी मिळेल. दूरदृष्टी असणारा नेता, आम्हाला विश्वास आहे. ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील.