सावंतवाडी,दि.६ मार्च
श्री महाशिवरात्र निमित्ताने श्री महादेव, श्री शंकर मंदिरात उत्सव साजरे होणार आहेत. आंबोली हिरण्यकेशी या तीर्थक्षेत्रावर मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी करण्यात येणार आहे. हे तीर्थक्षेत्रावर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील भाविक येतात.
माजगाव येथील महादेव मंदिर, नेमळे येथील कलया मलया तसेच ठिकठिकाणांच्या महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येक गावात घरोघरी महाशिवरात्रीच्या निमित्ताने उत्सव सण स्वरूपात साजरा केला जातो
आंबोली येथील हिरण्यकेशी नदी पूर्वे दिशेकडून पूर्वेदिशेकडे कर्नाटक राज्यातील संकेश्वर पर्यंत वाहते हे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. एसटी महामंडळ देखील वाहनांची भक्तांना येण्या-जाण्यासाठी सोय करतात. नुकतीच आंबोलीच्या नागरिकांनी तीर्थक्षेत्र स्वच्छता मोहीम राबवून तीर्थक्षेत्र स्वच्छ केले.
पांडवकालीन मंदिर म्हणून श्री देव सपतनाथ मंदिराची एका रात्रीत उभारणी केली. या सरमळे मंदिरामध्ये उत्सव सुरू असून तो महाशिवरात्रि पर्यंत चालणार आहे या मंदिरामध्ये देव प्रतिष्ठापना व विधिवत पूजाअर्चा देखील सुरू झाली आहे त्यामुळे या ठिकाणी देखील भाविकांचे मोठी गर्दी होईल अशी अपेक्षा सरमळे ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.