प्रांतीयांच्या घशात जाणारी आंबोली या लोकांच्या लोकशक्ती मुळे वाचली-खासदार विनायक राऊत
सावंतवाडी,दि.६ मार्च
आंबोली येथील कोकणातील हा दुसरा लवासा उध्वस्त झाला. यामागे नामधारी मालक दाखवून राजकीय शक्ती चे , धनिकांचे परप्रांतीयचे हात यामागे होते.कोणत्याही शक्तीला न घाबरता ग्रामस्थानी जी एकजूट दाखवली.त्या लोक शक्तीचा हा विजय आहे.ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आंनद आणि भविष्यातील पर प्रांतीयांच्या घशात जाणारी आंबोली या लोकांच्या लोकशक्ती मुळे वाचली आहे.असे प्रतिपादन आंबोली गावठणवाडी येथे खासदार विनायक राऊत यांनी केले. आंबोली या ठिकाणचे अतिक्रमण विरोधात कारवाई झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी याठिकाणी खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली.यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर,बाळा गावडे, कौस्तुभ गावडे, नीता गावडे, अनुप नाईक,बबन गावडे, संतोष पाताडे, ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच या ठिकाणी मनसे चे जिल्हाध्यक्ष अँड अनिल केसरकर,सुधीर राऊळ,सतीश आकेरकर,काशीराम गावडे उपस्थित होते. अण्णा केसरकर तसेच अँड अनिल केसरकर माजी सैनिक चे आत्माराम गावडे यांनीही भाषण केले.
यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले,माझ्या आयुष्यात मी रिफायनरी आणि आंबोली अशी दोन आंदोलने लोकशक्ती आणि एकजुटीने यशस्वी झालेली बघितली आहेत. या ठिकाणी आंबोली परप्रांतीयांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी खासदारकी पणाला लावण्याची ही वेळ होती.आपल्याला कोल्हापूर येथील मंत्री, आमदार तसेच धनिकांचे फोन आले.अनेक राजकीय नेत्यांचेही फोन आले.मात्र त्यावरून या कामात सावंतवाडी येथील कुटुंबीय हे नामधारी होते.त्यामागे राजकीय व परप्रांतीय शक्तीचा हात होता आणि भविष्यात आंबोली ही त्यांच्याच घशात जाणार होती त्यामुळे परप्रांतीयांना धडा शिकवावा लागेल त्यासाठी आपली हीच वेळ आहे. लोकांची एकजुटीचा हा विजय आहे ते कोणत्याही शक्तीपूढे वाकले नाही.यामध्ये विजवीतरण कार्यकारी अभियंता यांनी सुमोटो अधिकार वापरून कनेक्शन तात्काळ तोडले त्यानंतर उप वनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी,तहसीलदार,वन क्षेत्रपाल यांनी चांगले काम केले.प्रांताधिकारी यांनीही योग्य भाषेत विचारणा केली.यात मी जे जे अधिकारी दोषी आहेत वन जमिनीत लवासा उभारणारे त्यांना सोडणार नसल्याची भूमिका घेतली.वन चे प्रधान सचिव,महसूल चे सचिव,मुख्य वन संरक्षक यांच्याशी चर्चा करून कारवाईची मागणी केली. भविष्यात धन धांडग्यापासून आंबोली वाचवण्याची ही एक संधी होती.आज इथल्या लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्याचे समाधान वाटते.हा प्रकल्प झाला असता तर इथले भूमिपुत्र मात्र वंचित राहिले असते, असे ते म्हणाले
कबुलयातदार गावकर जमीन वाटप प्रश्न भाजप चे मंत्री, इथले मंत्री म्हणतात मीच सोडवला मात्र त्यात वन जमीन प्रश्न हा सोडवायचाआहे.पुन्हा एकदा मी आपल्यासमोर येणार आहे पण यावेळी धनुष्यबाण नाही तर मशाल घेऊन येऊ,धनुष्यबाण चोरला आहे त्यांना धडा शिकवला पाहिजे असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
चिपी मध्ये ९३७ एकर विमानतळासाठी घेतली,तोंडवली येथे सी वर्ल्ड साठी १३०५ एकर जमीन घेतली त्यातील ४०० एकर जमीन सी वर्ल्ड साठी दिली.असे प्रकार आहेत. गौतम अदानी यांनी उत्तराखंड ,गोंदिया येथे वन जमिनी घेतल्या आहेत.तिथले पॉवर प्लांट इथे आणले आहेत पश्चिम घाट किनारपट्टी संगमेश्वर लांजा ते कुडाळ येथे पर्यंत जमिनी घेतल्या.पाटगाव धरणाची जागा घेतली.६५०० एकर जागा घेतली. असे धनिकांनी तसेच पर प्रांतीयांच्या जागा हडपून देशोधडीला लावण्याचे प्रकार आहेत. इथल्या भूमिपुत्रांनी इथल्या जमिनी वाचवून पुढच्या पिडीसाठी त्या ठेवल्या पाहिजेत गाव वाचले पाहिजेत.भविष्यात याठिकाणचे वन जमिनी हे शेरे काढून टाकून गावातील लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचे काम केले जाईल, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.