मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता संजय भिकाजी जाधव यांना डेप्युटी चीफ इंजिनियर म्हणून पर्जन्य व जलवाहिनी नियोजन विभागात पदोन्नती

सावंतवाडी,दि.६ मार्च

सावंतवाडी सिंधुदुर्ग चे सुपुत्र तथा मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता संजय भिकाजी जाधव यांना डेप्युटी चीफ इंजिनियर म्हणून पर्जन्य व जलवाहिनी नियोजन विभागात पदोन्नती मिळाली आहे.
श्री जाधव हे मूळ सांगुळवाडी ता. वैभववाडी येथील रहिवाशी असून अत्यंत चिकाटी, अपार कष्ट करीत शिक्षण घेऊन या पदापर्यंत ते पोहोचले आहेत. साधी रहाणी व समर्पित वृत्तीने काम करण्याची प्रवृत्ती अशी त्यांची ख्याती आहे.
वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे व वैभववाडी शिक्षण संस्थेचे ते पदाधिकारी असून आंबेडकर चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीचे अनेकांनी अभिनंदन केले असून सावंतवाडीचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार भास्कर जाधव यांचे ते कनिष्ठ बंधू आहेत.