रमण किनळेकर यांना राज्यस्तरीय निवृत्त सेवा पुरस्कार प्रदान

0

वेंगुर्ला,दि.१४ जानेवारी

वेंगुर्ला येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमण काशिनाथ किनळेकर यना राज्यस्तरीय निवृत्त सेवा पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण १२ जानेवारी रोजी अहमदनगर येथे करण्यात आले.
महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनतर्फे दरवर्षी राज्यस्तरीय निवृत्त सेवा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कारामध्ये वेंगुर्ला येथील प्रसिद्ध सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमण किनळेकर यांचा समावेश होता. श्री.किनळेकर यांनी सेवानिवृत्त कर्मचारी व सभासद यांना मार्गदर्शन, वेंगुर्ला तालुका पेन्शनर्स असोसिएशनचा निधी वाढविण्यासाठी तसेच स्वतंत्र इमारत तयार करण्यासाठी सक्रीय सहभाग, वेंगुर्ला तालुक्यात वाडीवार फिरून सेवानिवृत्त पेन्शनर्स गाठीभेटी व मार्गदर्शन, वेंगुर्ला तालुका पेन्शनर्स आयोजित उपक्रम व कार्यक्रमात विविध विषयावर सहभाग व मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
या पुरस्काराचे वितरण १२ जानेवारी रोजी श्री गुरूदत्त देवस्थान, श्रीक्षेत्र देवगड-अहमदनगर, ता. नेवासा येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक श्री. किनळेकर यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराबद्दल सर्वस्तरांतून किनळेकर सर यांचे अभिनंदन होत आहे.