शिवसेना नेते किरण सामंत ७ मार्च रोजी आचरा भेटीला

आचरा,दि.६ मार्च(अर्जुन बापर्डेकर)

शिवसेना नेते किरण सामंत गुरुवार ७ मार्च रोजी आचरा येथे येत असून यावेळी ते लोकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. यासाठी सायंकाळी आठ वाजता ते डॅफोडील्स रिसाॅर्ट येथे उपस्थित राहणार आहेत.यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे यांसह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर रात्रौ ९.३०वाजता भोजनासाठी त्यांची वेळ राखीव ठेवण्यात आली आहे.तरी आचरा भागातील ग्रामस्थांनी आपल्या समस्या निवारण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे यांनी केले आहे.