भिरवंडे गावात ५ कोटींची विकासकामे मंजूर ; भिरवंडे ग्रामस्थांनी पाठीशी राहावे,असे आवाहन
कणकवली दि.६ मार्च (भगवान लोके)
भिरवंडे गावाचे आणि राणे कुटुंबीय यांचे नाते हे कायमचे आहे. तुम्ही सर्वजण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर प्रेम करणारी माणसं आहात, हे नातं आपल्याला असेच पुढे न्यायचे आहे .त्यामुळे या गावच्या विकासासाठी लागेल,तेवढा निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही आम नितेश राणे यांनी दिली.
भिरवंडे गावातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन आ.नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले.यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत,सौ संजना सावंत, शिवसेना उप तालुका प्रमुख सुनील सावंत, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे मनिष सावंत,रमेश सावंत, संतोष सावंत, विजय सावंत, अनाजी सावंत, सतीश सावंत बुवा, सुनील सावंत, श्रीकांत सावंत राजेश सावंत, सुरेशचंद्र सावंत, सुभाष सावंत, सदानंद सावंत, बद्रीनाथ सावंत, सुधीर सावंत, भिरवंडे व खलांतर गांधीनगर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोट्या सावंत म्हणाले,भिरवंडे गावचा यापूर्वीचा विकास ही राणे कुतुबियांच्या माध्यमातूनच झाला आहे आणि यापुढील विकास ही त्यांच्याच दूरदृष्टी तुन होणार आहे. आपण सर्वांनी असेच राणे कुटुंबियांवर प्रेम कायम ठेऊया आणि विकासात अग्रेसर राहूया ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भिरवंडे गावातील सुमारे पाच कोटी रुपयांची विविध विकासकामे मंजूर असून यामध्ये प्रामुख्याने भिरवंडे मुख्य रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून १ कोटी ५० लाख, बजेट मधून ५० लाख, जिल्हा नियोजन मधून ३० लाख, रुपये, गांधीनगर खरलवाडी ते हनुमंत वाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे व खडशी नदी वर ब्रिज बांधणे दोन कोटी सत्तर लाख,मुरडवेवाडी गणेशघाट रस्ता डांबरीकरण करणे पाच लाख, जांभूळ भाटले स्मशान भूमी रस्ता डांबरीकरण करणे पाच लाख, जांभूळ भाटले गणेश घाट बांधणे अडीच लाख, जांभूळ भाटले पायावटेवर मोरी बांधणे अडीच लाख, जांभूळ भाटले सदानंद सावंत घर रस्ता डांबरीकरण करणे ३ लाख, शेरडकर वाडी रस्ता डांबरीकरण करणे ५ लाख, परतकामवाडी रस्ता डांबरीकरण करणे दहा लाख, परतकम ख्रिश्चन वाडी रस्ता डांबरीकरण करणे ५ लाख, अशी सुमारे ५ कोटी रुपयांची कामे असून भिरवंडे ग्रामस्थांनी आम नितेश राणे, संदेश उर्फ गोट्या सावंत, सौ संजना सावंत यांचे आभार मानले आहेत.