कणकवली, देवगड जामसंडे, वाभवे-वैभववाडी नगरपंचायतींना दहा कोटीचा विकासनिधी

आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्याने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मिळाला निधी;तिन्ही नगरपंचायत मधील असंख्य विकास कामांना मंजुरी

कणकवली दि.६ मार्च(भगवान लोके)

देवगड-जामसंडे नगरपंचायत साठी चार कोटी रुपये,तर वाभवे-वैभववाडी नगरपंचायत साठी दोन कोटी तर कणकवली नगरपंचायत साठी चार कोटी असे दहा कोटी रुपयांचा निधी “वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान” या योजनेंतर्गत प्राप्त झाला आहे. वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी शासनाने नगरपंचायतींना निधी द्यावा यासाठी भाजप नेते आमदार नितेश राणे हे सातत्यपूर्ण नगर विकास मंत्रालय, अर्थमंत्रालयाकडे पाठपुरावा करत होते.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कडे तर कणकवली,देवगड वैभववाडी नगरपंचायतींच्या विकासासाठी निधीसाठी मागणी केली होती. या सर्व प्रयत्नांना यश आले असून दहा कोटी एवढा भरघोस निधी प्राप्त झालेला आहे.

या विकास निधीमध्ये देवगड-जामसंडे नगरपंचायत क्षेत्रातील कामे, पुढील प्रमाणे;
प्रभाग क्र. ४ मधील जामसंडे स्मशानभुमी अंतर्गत कामे करणे,२ प्रभाग क्र. ९ मधील मारुती मंदिर ते सारंग घर घाटी कॉक्रीटीकरण करणे,प्रभाग क्र. १६ मधील जामसंडे बेलवाडी शाळा ते तुरुलल नाडी रस्सा अस पाच्या घराजवळ रस्त्याला संरक्षक मित बांधणे,४ प्रभाग क जामसंडे ३. खाकशी तिता पेट्रोल पंप से पाणी टाकी सदाशिव मजसाने घरापर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे व गटार बांधणे.५ प्रभाग क्ररत्राकशी वरचीवादी मुख्य रस्त्यापासून रस्त्याचे नूतनीकरण व ३. मजबुतीकरण करणे, देवगड सहा नेनेनगर से जीवन प्रधिकरण पाण्याच्या टाकीपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणेदेवगड जामसंडे नगरपंचायत प्रभाग १० मधील रवी तेली ते अशोक क घरापर्यंत रस्ता तयार करणे व गटार बांधणे शैलेश महाडीक घर ते हॉटेल यशोदा पर्यंत गटार बंदिस्त करणे,नलावडे कॉम्प्लेक्स रसा नुतनीकरण १५७ मार्ग, না करणे,१० देवगड जामसंडे टिकजनगर कौस्तुभ जामसंडेकर पर अंतर्गत कॉलनी ते पेवाडी सडा नवीन रस्ता तयार करणे.११ जामसंडे कावलेवाडी दत्तमंदिर स्टॉप से अशोक कायले बाग पर्यंत रस्ता तयार करणे१२ जामसंडे बाजारपेठ बंद्रभागा दुकान ते विजय पानी घरापर्यंत रस्ता नुतनीकरणकरणे व आर सी बंदिस्त गटार तयार करणे, १३ देवगड जामसंडे नगरपंचायत प्रभाग ७ तुळशीनगर अंगणवाडीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे में रसयाला गटार बांधणे, १४ )जामसंडे विष्णुनगर राजेंद्र कोद्धये यांच्या घराजवळील खुल्या क्षेत्रामध्ये गार्डन तयारकरणे. १५) भास्करराव गोगटे मार्ग ते कृषि कार्यालयापर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करने अशी कामे मंजूर झाली आहेत.
वाभवे-वैभववाडी नगरपंचायत क्षेत्रातील कामे मंजूर कामे पुढील प्रमाने,नगरपंचायत वाभवे-वैभववाडी कार्यालयासमोर फुटपाथ बांधणे.वॉर्ड क्र. १३ मधील सांगूळवाडी रस्त्याची सुधारणा करणे.नगरपंचायत वाभवे-वैभववाडी हद्दीतील कोंडवाडी येथे प्रवीण रावराणे बागेजवळ गटार बांधणे.नगरपंचायत वाभवे वैभववाडी हद्दीतील वॉर्ड क्र.६ येथील दत्त विद्यामंदिर शाळेजवळील संरक्षक भिंत बांधणे.नगरपंचायत वाभवे-वैभववाडी हद्दीतील वॉर्ड क्र.२ माईणकरवाडी ते बाळा शिरावडेकर घर पर्यंत रस्ता बनवणे.वॉर्ड क्र.१२ मध्ये सुवर्ण मंगल कार्यालय ते माळवदे घर पर्यंत बंदिस्त गटार बांधणे.वॉर्ड क्र.१ मध्ये तहसिल ऑफिस रस्त्यालगत फुटपाथ बांधणे.वॉर्ड क्र.१६ मध्ये पाण्याची टाकी बांधणे.वॉर्ड क्र.१५ सुभाष रावराणे घर ते स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता तयार. करणे.नगरपंचायत वाभवे-वैभववाडी हद्दीत खुली व्यायाम शाळा तयार करणे,ही कामे मंजूर केली आहे.
तर कणकवली नगरपंचायत मधील
कणकवली नगरपंचायत आरक्षण क्र. २७ व २८ वर क्रीडासुविधा केंद्र बांधणे साठी चार कोटी मंजूर केले आहेत.
तसा जीआर उप सचिव श्रीकांत आंडगे
महाराष्ट्र शासन यांनी काढला आहे.