सावंतवाडी दि.६ मार्च
माध्यमिक विद्यालयांनी विद्यार्थी पटसंख्या आणि शिक्षक यांच्यावर परिणाम होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी विद्यालयांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले पाहिजे तरच पुढील काळामध्ये हायस्कूलना अडचणी येणार नाहीत,असा विश्वास माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केला.
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जिल्ह्यातील २०२ शाळांना प्रोजेक्टर साहित्य वाटप केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क कार्यालयात राजन तेली यांच्या हस्ते माध्यमिक विद्यालयांना प्रोजेक्टर वाटप करण्यात आले. यावेळी राजन तेली बोलत होते
यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, श्री नांदगावकर ,भाजप तालुका मंडळ अध्यक्ष रवींद्र मडगावकर, वेंगुर्ले अध्यक्ष सुहास गा्वंडळकर, दोडामार्ग अध्यक्ष सुधीर दळवी, जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, रामचंद्र घावरे, सुहास देसाई, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रथमेश तेली, शाईराज नाईक, परिक्षीत मांजरेकर, आनंद नेवगी तसेच पदाधिकारी उपस्थित होते .
राजन तेली म्हणाले, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जिल्ह्यातील २०२ विद्यालयांना प्रोजेक्टर दिला. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे हे काम अलौकिक असे आहे. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवात शाळेंना अशा पायाभूत सुविधा देण्यात तेच यशस्वी ठरले आहेत .शिक्षक आमदारांनी शाळांची देखभाल आणि त्यांच्या पायाभूत सुविधांकडेच लक्ष द्यायला पाहिजे आणि ते त्यांनी केले असे राजन तेली यांनी सांगितले
तेली म्हणाले,माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी पटसंख्या वाढता येईल का ? आणि शिक्षक कमी होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले पाहिजे. नाहीतर भविष्यकाळात हायस्कूल ना अडचणींना सामोरे जावे लागेल. विद्यालयांनी स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत देखील विद्यार्थ्यांत जनजागृती केली पाहिजे. सध्या रस्त्यांची पायाभूत सुविधा झाल्याने शिक्षक आणि शासकीय कर्मचारी तालुका मुक्कामी राहतात असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले,मुलीची संख्या जास्त असल्याने अनेक विद्यालयात स्वच्छतागृह देखील संख्या वाढवली पाहिजे असे त्यांनी सांगून विद्यार्थ्यांना योग्य संधी देण्यासाठी शिक्षकांनी लक्ष घालावे असे तेली म्हणाले
यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, सुहास देसाई, श्री नांदगावकर, श्री घावरे, श्री . देसाई तसेच. मान्यवरांनी विचार व्यक्त केले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील माध्यमिक शाळांना यावेळी प्रोजेक्टर माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच आमदार म्हात्रे यांच्या वतीने श्री नांदगावकर यांनी राजन तेली यांचा सत्कार केला.
Home आपलं सिंधुदुर्ग विद्यालयांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले पाहिजे तरच पुढील काळामध्ये हायस्कूलना अडचणी येणार...