वैभववाडी येथे आयोजित  १५ व्या भव्य राष्ट्रीय शुटींग बाॕल स्पर्धेत खली पंजाब या संघाने प्रथम क्रमांक पटकावला

वैभववाडी, दि.६ मार्च

ग्रामसेवा क्रीडा मंडळ उंबर्डे यांच्यावतीने वैभववाडी येथे आयोजित  १५ व्या भव्य राष्ट्रीय शुटींग बाॕल स्पर्धेत खली पंजाब या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर इस्त्याक मालेगाव व मनेराजुरी सांगली या संघाने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकवला. या संघाना अनुक्रमे १५ हजार, १० हजार व ५ हजार तसेच आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे उत्कृष्ट शुटर रस्त्याक मालेगाव, उत्कृष्ट गेटमन इम्तीयाॕज मालेगाव , उत्कृष्ट लिप्टर कुणाल पंजाब तर आदर्श संघ क्रांता साखर कुंडल सांगली यांना गौरविण्यात आले. एकूण १६ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.
प्रकाशझोतात खेळविण्यात आलेल्या स्पर्धेत चौथा क्रमांक आलेल्या आय.एस.सी.मालेगाव संघाला ५ हजार व आकर्षक चषक तसेच सोलापुर अमिर काझी, क्रांती साखर कुंडल सांगली, टेंबुर्णी सोलापूर , सातारा या संघांना प्रत्येकी दोन हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी सर्व चषक उदयोजक सुनिल नारकर यांच्याकडून देण्यात आले.  या स्पर्धेचे उद्दघाटन माजी सभापती अरविंद रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी होते. नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत,
बक्षिस वितरण सिंधुदुर्ग जिल्हा बॕंकचे कदम यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी असो.अध्यक्ष संकपाळ, सुभाष तळेकर, शरद नारकर, पापा मौलवी, एस.पी.परब, संजय लोके, गुलाबराव चव्हाण, संतोष टक्के , अॕड महेश रावराणे, उत्तम सुतार, साबीर मौलवी, विजय केळकर, शहाबुद्दिन नाचरे, नितीन महाडीक, संजय महाडिक , आलिवा बोथरे, हाजी सलीम पाटणकर, अॕड प्रताप सुतार, हुसेन लांजेकर, धर्मरक्षित जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
अंतिम सामन्यात इत्याक मालेगाव व पंजाब खली या संघातील खेळाडून चमकदार खेळ करत प्रक्षेकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.