तरुणाईने स्वतःची क्षमता व सुप्त गुण शोधा-प्रा.खानोलकर

0

वेंगुर्ला,दि.१४ जानेवारी

भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला यांच्यावतीने राष्ट्रीय युवा दिवसाचे औचित्य साधून बॅ.खर्डेकर महाविद्यालयात उद्बोधन वर्ग घेण्यात आला. या वर्गात ‘राष्ट्र उभारणीत तरूणांचे योगदान‘ यावर प्रा.वैभव खानोलकर यांनी मार्गदर्शन केले. आज तरुणाने नेमके कशाप्रकारे आपली राष्ट्रनिष्ठा राखण्यासाठी तरूणाईने स्वतःच्या क्षमता ओळखणे आणि स्वतः मधील सुप्त गुण शोधणे गरजेचे असल्याचे प्रा.खानोलकर यांनी सांगितले.
यावेळी प्राचार्य एम.बी.चौगले, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपाचे उपजिल्हाप्रमुख बाळू देसाई, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रा.वैभव खानोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ.सचिन परूळकर यांनी केले.