कुणकेश्वर यात्रौत्सवा करिता देवगड आगार सज्ज!

कुणकेश्वर यात्रौत्सवा करिता २५ एसटी गाड्या तैनात 

देवगड,दि .६ मार्च
तालुक्यातील कुणकेश्वर यात्रौत्सवा करिता देवगड आगार सज्ज झाले असून
एकूण २५ एसटी गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत.तालुक्यातील प्रमुख मार्गावर या जादा यात्रा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत त्याच प्रमाणे आवश्यकतेनुसार गाड्यांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक निलेश लाड यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक व विभागीय वाहतूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा नियोजन करण्यात आले आहे.
देवगड आगारातून मोंडतर टेंबवली कुणकेश्वर ,वळीवंडे तोरसोळे कुणकेश्वर,जामसंडे कुणकेश्वर ,बागतळवडे तळे बाजार कुणकेश्वर ,आयनल कोलोशी कुणकेश्वर,टेंबवली तेलिवाडी कुणकेश्वर ,देवगड कुणकेश्वर, किंजवडे डोबवाडी कुणकेश्वर,पोयरे खुडीपाट नारिंग्रे,कुणकेश्वर,(व्हाया मुस्लिमवाडी आयत्न वाडी),
तेलिवाडी,ताम्हणेतर वाणीवडे कुणकेश्वर, मिठमुंबरी इळयेसडा दाभोळ पूल कुणकेश्वर ,नाद ओंबळ कुणकेश्वर ,शिरवली कुणकेश्वर,रेंबवली साळशी चाफेड,भरणी कुणकेश्वर या मार्गावर यात्रा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
दि.८ मार्च ते १० मार्च या कालावधीत या यात्रा फेऱ्या प्रवासी,भाविक भक्त याना सेवा देणार आहेत.या व्यतिरिक्त
दि.८ ते ११ मार्च या कालावधीत स.७ वा. देवगड अक्कलकोट,स.८.०० देवगड पुणे,स.९ वा. देवगड तुळजापूर,दु.३ वा. देवगड बोरीवली दि.१० मार्च रोजी सोडण्यात येणार आहे.सायं देवगड बोरिवली स्लीपर,सायं ५.३० वा. देवगड पुणे,स.७.१५ देवगड बेळगाव,स.११.५० वा. देवगड बेळगाव,दु १.३० वा. देवगड बेळगाव,,स.६.०० वा. देवगड पणजी,दु.११.३० वा. देवगड पणजी प्रवासी फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.तरी प्रवासी वर्ग व भाविक भक्तगण यांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक निलेश लाड यांनी केले आहे.स्थानक प्रमुख श्रीकांत
सैतवडेकर,वाहतूक निरीक्षक गंगाराम गोरे सर्व वाहतूक नियंत्रक,कार्यशाळा अधीक्षक रापम कर्मचारी सज्ज झाले आहेत.

दक्षिण कोकणची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा उत्सवा करीता जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार आग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली १९५ पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड तैनात करण्यात आला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या नेतृत्वाखाली देवगड पोलीस स्थानक पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचेसह एकूण २ पोलीस निरीक्षक, १० पोलीस उपनिरीक्षक, २ सहा. पोलीस उपनिरीक्षक ,८० पोलीस कर्मचारी पुरुष पोलीस ५० ,महिला पोलीस ३०,तसेच १०० होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत.ठिकठिकाणी पोलीस पथक,फिरते पथक,बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहेत.