योग प्राणायाम, फिटनेस आणि कल्चरल सेंटरचे होणार उद्घाटन
तळेरे,दि .६ मार्च
गॅलेक्सी योगा व पतंजली योग योगा समिती सिंधुदुर्ग आणि तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने खास लोक आग्रहस्तव कासार्डे-तळेरे पंचक्रोशीतील महिलांसाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक ८ मार्च २०२४ रोजी महिलांसाठी मोफत योग शिबीर तसेच स.११.३० वा वा.मान्यवरांच्या उपस्थितीत गॅलॅक्झी योगा प्राणायाम, फिटनेस आणि कल्चरल सेंटरचे उद्घाटन अभिषेक मंगल कार्यालय कासार्डे तिठा येथे होणार आहे.
या दिवशी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सायं.४.३० वा खास महिलांसाठी एक दिवशी मोफत योग शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.
या योगा प्राणायाम, फिटनेस आणि कल्चरल सेंटरचे उद्घाटन माजी आमदार व भाजपाचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांच्या हस्ते होणार आहे.
तर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे स्थानिक व्यवस्था समितीचे जेष्ठ सल्लागार प्रभाकर कुडतरकर ,भारत स्वाभिमान पतंजली योग समिती सिंधुदुर्गचे जिल्हा प्रभारी तुळशीराम रावराणे, प्रकाश कोचरेकर, कासार्डे विकास मंडळ मुंबईचे सहसचिव आनंद कासार्डेकर, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे,कासार्डे माध्यमिक विद्यालय स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर, कासार्डे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मधुकर खाड्ये, कासार्डे विद्यालयाचे नूतन मुख्याध्यापक नारायण कुचेकर, तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराचे अध्यक्ष उदय दुधवडकर, आयडियल ज्युडो कराटे जिल्हा असोसिएशन, सिंधुदुर्गचे संस्थापक दत्तात्रय मारकड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या दोन्ही कार्यक्रमाला योग- प्राणायामप्रेमी उपस्थित रहावे तसेच महिलांनी सहज हालचाल होईल असा पेहराव करून तसेच सोबत रजई किंवा बेडसिट घेऊन यावे.जर योगा मॅट असेल अवश्य घेऊन वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन राज्य योगा मुख्यप्रशिक्षक, पंच तथा सिंधुदुर्ग जिल्हा योगा असोसिएशनचे सहसचिव संजय भोसले (मोबा-९४२२३७३९७७), राज्यस्तरीय खेळाडू तथा योगा शिक्षक साईप्रसाद बिजीतकर आणि राज्यस्तरीय खेळाडू व योगा शिक्षिका कु.तेजल कुडतरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.