जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जीवन प्रबोधनी ट्रस्टकडून शिरवली येथे ८ मार्च रोजी ब्लँकेट वाटप

तळेरे,दि .६ मार्च

मुंबई येथील जीवन प्रबोधनी ट्रस्टच्यावतीने शिरवली येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ब्लँकेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी, 8 मार्चला सकाळी 9 वा. शिरवली ग्रामपंचायत येथे होणार आहे.

यावेळी संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात येणार आहे. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिरवली सरपंच सुचिता मोहिते, गणेश सावंत, संकेत काडगे, अमोल काडगे, भिकाजी जठार, संदीप पोयरेकर, स्वप्नील पोयरेकर, कल्पेश कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी शिरवली गावातील 50 ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिना निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा संपूर्ण कार्यक्रम समाजसेवक तथा जीवन प्रबोधनी ट्रस्टचे संस्थापक सत्यवान नर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. जीवन प्रबोधनी ट्रस्टच्या माध्यमातून मुंबई येथे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.