जागतिक महिला दिनानिमित्त तळेरे येथे उद्या ७ मार्च रोजी महिलांसाठी खास समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन

 तळेरे,दि .६ मार्च

जागतिक महिला दिनानिमित्त तळेरे येथे उद्या दि. ७ मार्च रोजी दुपारी ३ वा. महिलांसाठी खास समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा डॉ.एम.डी.देसाई सांस्कृतिक भवनात होणार असून स्व.सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट, वाचनालय आणि प्रज्ञांगण यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कोणत्याही प्रकारे स्पर्धा होणार नाही. तर प्रत्येक सहभागी संघाला सहभाग सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. महिलांमधील असलेले कला कौशल्याला वाव मिळावा आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे. तसेच, महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, यादृष्टीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.