सेवानिवृत्त मुख्याध्यापक मदन पांढरे यांचे निधन

सावंतवाडी,दि .६ मार्च

सावंतवाडी तालुक्यातील आजगांव माळयारवाडी येथील रहिवासी तथा तिरोडा प्रशालेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मदन विष्णु पांढरे (७५) यांचे बुधवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. घरीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यातच बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
अखंड रत्नागिरी जिल्हा असताना मदन पांढरे यांनी आपल्या सेवेची सुरुवात खेड तालुक्यातील कासई बोरवाडी शाळेत शिक्षक म्हणून केली होती. जिल्हा विभाजनानंतर त्यांची शिरोडा नंबर १ शाळेत बदली झाली. त्यानंतर तिरोडा शाळेत मुख्याध्यापक म्हणून २००६ साली ते सेवानिवृत्त झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मूलगा, विवाहीत मुलगी, सून, भाऊ, भावजय, नातवंडे असा परिवार आहे. क्रिकेट समालोचक समीर पांढरे तसेच जिल्हा रुग्णालयातील परिचारीका दीपा पांढरे यांचे ते वडिल तर रत्नागिरी साखरपे येथील निवृत्त शिक्षक सत्यवान पांढरे यांचे ते भाऊ तर पत्रकार सचिन रेडकर यांचे मामा होत.