गोवा येथे झालेल्या अपघातात कळणे करमळीवाडी येथील युवतीचा दुदैवी मृत्यू तर एकजण जखमी

दोडामार्ग, दि. ६ मार्च 

पेडणे तालुक्यातील कासारवर्णे गोवा येथे बुधवारी सकाळी साडेआठ वाजता झालेल्या दोन स्कुटर अपघातात स्कुटर कळणे करमळीवाडी २५ वर्षीय युवती कु. सुजाता सुरेश सातार्डेकर हिचा दुदैवी मृत्यू झाला. तर दुसरा स्कुटर चालक फैझर फ्रान्सिस मास्कारेन्हास हसापूर गोवा जखमी झाला. घटनेमुळे कळणे करमळी गावात हळहळ व्यक्त होत आहे. दोडामार्ग तालुक्यातील हजारो युवक युवती याना रोजगार नसल्याने पोटापाण्यासाठी गोवा येथे जावे लागते. राज्य सरकारचे अपयश आहे. दोडामार्ग तालुक्यात उद्योग उभे राहिले नसल्याने अशा प्रकारे अपघाताना सामोरे जावे लागत आहे. या अपघात प्रकरणी मोपा गोवा पोलिस अधिक तपास करत आहेत