सारस्वत ब्राम्हण समाजाचा स्नेहमेळावा व वधु-वर मेळावा

0

वेंगुर्ला,दि.१४ जानेवारी

गौड सारस्वत ब्राम्हण समाज सिंधुदुर्ग यांचा स्नेहमेळावा व वधुवर मेळावा रविवार दि. २८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता स्वामिनी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याचे अध्यक्षस्थान सारस्वत बँकेचे संचालक सुनिल सौदागर हे भूषविणार असून पमुख पाहुणे म्हणून विलिग्डन महाविद्यालय, सांगेली येथील प्रा. विनायक राजाध्यक्ष तसेच सारस्वत समाज सांगलीचे अध्यक्ष डॉ. विकास कोटणीस, सारस्वत विकास मंडळ कोल्हापूरचे माजी विश्वस्त शरद प्रभावळकर आदी मान्यवर या मेळाव्यास उपस्थित रहाणार आहेत.
या मेळाव्याच्या पहिल्या सत्रात सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत नोंदणी, अल्पोपहार, मान्यवरांचे मार्गदर्शन, ज्ञातीतील विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य असलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच ‘सारस्वत मित्र‘ पुरस्कारचे वितरण केले जाणार आहे. दुपारच्या सत्रात दुपारी १ ते सायंकाळी ४.३० पर्यत सहभागींना भोजन, वधुवर नोंदणी, परिचय, माहिती व संवाद झाल्यानंतर आभार व समारोप होणार आहे.
सारस्वत समाजतील ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे, त्यांनी आपली नावे समाज संघटनेच्या अध्यक्षा सुजाता पडवळ (९४२१२६८२३९)यांचेकडे २२ जानेवारीपर्यंत द्यावीत. या मेळाव्यास सारस्वत ज्ञातीतील बंधु-भगिनिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत नाडकर्णी यांनी केले आहे.