सावंतवाडी दि.७ मार्च
चौकुळ येथील दुर्गम भागांमधील धनगरवाडी तोरणीची मूस या परिसरामध्ये चौकुळ ग्रामपंचायत भगीरथ प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने २२ बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यात आले याच्या उद्घाटन प्रसंगी संबंधित मान्यवरांनी तेथील ग्रामस्थांना प्रबोधित केले.
यावेळी भगीरथ प्रतिष्ठानचे प्रसाद देवधर, नासिर भाई बोरसाद वाला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरी क्लब, सरपंच सुरेश शेटये, गुलाबराव गावडे, पांडू गावडे, डॉ. विनया बाड ,भरत गावडे ,प्रदीप शेवडे, रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष सुहास सातोस्कर, रमेश भाट आदी उपस्थित होते.
यावेळी प्रत्यक्ष बायोगॅसची पाहणी करण्यात आली व बायोगॅस कार्यान्वित झाल्याची खात्री करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी भगीत प्रतिष्ठानचे प्रसाद देवधर यांनी मनोगत व्यक्त करताना अशा प्रकारचे अनेक प्रकल्प यापुढेही एकमेकांच्या सहाय्याने अनेक गावांमध्ये करायचे असल्याचे सांगितले तर नसीर भाई यांनी इतक्या दुर्गम भागात लोक राहतात हेच मोठे आश्चर्य असून अशा प्रकारे या लोकांना या सुविधा मिळत आहेत यासाठी त्यांनी ग्रामपंचायत व रोटरी क्लब यांचे आभार मानले व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले
यावेळी त्यांनी शाळेला संगणक संच प्रत्येक घराला म्हणजेच २२ घरांना एक कुकर व दोन लाख बायोगॅस साठी आणखी मंजूर केले सचिव प्रवीण परब यांनी यावेळी आभार मानले.
Home आपलं सिंधुदुर्ग चौकुळ येथील रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने २२ बायोगॅस प्रकल्प...