सावंतवाडी दि.७ मार्च
मागिल वीस वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यामध्ये नोकरीच्या निमित्ताने जाताना किंवा येताना मृत्युमुखी पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण-तरुणींच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र शासनाने जबाबदारी स्वीकारून प्रत्येकी २० लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. सध्या होणाऱ्या अपघातांची मालिका चिंताजनक आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
गेली साडेचौदा वर्ष दीपकभाई केसरकर तरुणांना रोजगाराचे गाजर दाखवत आहेत. नोकरीच्या निमित्ताने गोव्यामध्ये जाणारे तरुण-तरुणी मृत्युमुखी पडले तरीही सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्याच्या विद्यमान आमदार तसेच शिक्षण व मराठी भाषा मंत्री तरुण तरुणांची फसवणूक का करत आहेत असा प्रश्न साळगावकर यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले,आडाळीमध्ये एमआयडीसी आली,पण एकही उद्योग आज पर्यंत उभा का राहू शकला नाही? किती बळी हवेत तुम्हाला ?कधीतरी गांभीर्याने घ्या ,तुमच्या घोषणांच्या वर्षावाणी लोक आता नाक मुरडत आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
सन २००७ मध्ये सुरू झालेला अंबोलीतील पर्यटन विकास महामंडळाचा प्रकल्प सुरू झाला असता तर तिथे ५० कामगार नोकरीला लागू शकले असते. फक्त पर्यटनाची वाल्गना करायचे आणि निघून जायचं मुंबईला, दीपक केसरकर जनता माफ करणार नाही. अनेक तरुण तरुणी नोकरीसाठी जात असताना मृत्यू पडले हे सत्य आहे त्यांचे आता तोंडाशी आलेल्या कमवता मुलगा मुलगी नोकरीसाठी बाहेर पडून जातात परत घरात परतून येतील याची शाश्वती नाही हे किती दिवस चालणार आहे? आणखी किती वर्ष तुम्हाला आमदारकी हवी आहे ? लोकांची फसवणूक थांबवा असे साळगावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
साळगावकर म्हणाले,शास्वत विकासाची अपेक्षा होती तुमच्याकडे लोकांच्या प्रश्नासाठी बोलण्यासाठी वेळ नाही तसा तुम्ही वेळ कधीच दिला नाही. तुमच्या मनमानी कारभारामुळे अनेकांना जीव गमवावे लागत आहेत त्याची सर्व जबाबदारी तुमची आहे.