अवैधरित्या व विनापरवाना होलसेल गुटखा विक्री करणाऱ्या एका व्यावसायिकाच्या गोडावूनवर छापा

सावंतवाडी, दि. ७ मार्च 
अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई व सिंधुदुर्ग विभागाच्या भरारी पथकाने बुधवारी सायंकाळी सावंतवाडी शहरातील एका अवैधरित्या व विनापरवाना होलसेल गुटखा विक्री करणाऱ्या एका व्यावसायिकाच्या गोडावूनवर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईमुळे सावंतवाडी शहरात खळबळ उडाली आहे.

सावंतवाडीत अवैधरित्या गुटखा विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई व सिंधुदुर्ग विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार दोन्ही विभागाच्या पथकांनी सावंतवाडीत तळ ठोकला. शहरात अवैधरित्या व विनापरवाना होलसेल गुटख्याची विक्री व साठा करून ठेवल्याची माहिती घेत होलसेल विक्री करणाऱ्या मालकाचा शोध घेत त्याच्या गोडावूनवर छापा टाकला. यात लाखो रुपये किंमतीचा अवैध गुटख्याचा साठा आढळला. या प्रकरणी संबंधित व्यावसायिकाला पथकाने ताब्यात घेतले आहे. पथकातील एका अधिकाऱ्याने या कारवाईला दुजोरा दिला आहे. नेमका किती मुद्देमाल आहे याची गणती सुरू असल्याचे स्पष्ट केले.