पालकमंत्री रविंद्र चव्हाण,आ.नितेश राणेंची उपस्थिती ; माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती…
कणकवली दि.७ मार्च (भगवान लोके)
कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत सर्वागीण विकास झाला आहे.कणकवली शहराची विकासात्मक ओळख निर्माण झाली आहे.कणकवली आणि जाणवली गावाला जोडणारा हा पुल दुवा ठरणारा आहे.या पुलाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते शुक्रवार ८ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता गणपती साना येथे होणार आहे.या सोहळ्याला पालकमंत्री रविंद्र चव्हाण,आ.नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे,अशी माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली शहराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नारायण राणे,पालकमंत्री रविंद्र चव्हाण,आ.नितेश राणे यांच्या माध्यमातून हा पुल मंजूर झाला आहे.या पुलासाठी ८ कोटी ८ लाख मंजूर झाले आहेत,जाणवली आदर्शनगर या रस्त्याला हे पुल जोडले जाणार आहे.नागरिकांना,कणकवली पलीकडे असणाऱ्या १० -१५ गावातील लोकांना ,बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये जाणाऱ्या मुलांसाठी हा पर्यायी मार्ग सोयीचा ठरणार आहे.कणकवली शहरात हे एक विकासात्मक पाऊल आहे.त्या पुलाची ८० लांबी , रुंदी ११.६७ मीटर आहे.पुलाची उंची ६ मिटर असून त्याच्या बांधकामासाठी मुदत एक वर्ष आहे.या पुलाला पाणी साठविण्याठी आमचे प्रयत्न असणार असल्याचे श्री.नलावडे यांनी सांगितले.