फोंडा घाटामध्ये विद्युत केबल वाहतूक करणारा कंटेनर झाला पलटी

फोंडाघाट, दि.७ मार्च (संजय सावंत)
मध्यप्रदेश वरून गोव्याच्या दिशेने विदयुत केबल ची वाहतूक करणारा कंटेनर क्र. एम एच 46- बी एफ 3803 हा फोंडाघाट पासून सुमारे 5 किमी वरील अवघड वळणावर आला असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या मधोमधच कंटेनर पलटी झाला.
सदरची घटना आज सकाळी सुमारे 10.30 च्या दरम्याने घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की, कंटेनर
चालक ओमप्रकाश जगमोहन बर्मा वय ४५ राहणार उत्तर प्रदेश प्रतापगढ हे आपल्या ताब्यातील कंटेनर क्र. एम एच 46- बी एफ 3803 यामधून मध्यप्रदेश वरून गोव्याच्या दिशेने विदयुत केबल ची वाहतूक करत असताना फोंडाघाट बाजारपेठ पासून सुमारे 5 किमी अंतरावरील फोंडा घाटातील अवघड वळणावर सकाळी १०:३० च्या दरम्याने आला असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने विदयुत केबल च्या ड्रम ने भरलेला कंटेनर रस्त्याच्या मधोमध पलटी झाला त्यामुळे फोंडाघाट कोल्हापूर मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे काही तास वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुदैवाने कंटेनर चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही . सदर घटना समजताच फोंडाघाट चेक पोस्ट वर असणारे पोलीस कॉन्स्टेबल मारुती बारड यांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली यावेळी महामार्ग वाहतूक चे पोलीस हवालदार राजेश ठाकूर हवालदार नितीन चोडणकर पोलीस कॉन्स्टेबल महादेव साबळे, हवालदार उत्तम वंजारे याचबरोबर बांधकाम विभागचे कर्मचारी शाहू शेळके उपस्थित होते