देशामध्ये एकच गॅरंटी चालते ती म्हणजे नरेंद्र मोदी यांचीच – आ.नितेश राणे

0

कणकवली येथे महायुती जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा ; मेळाव्याला कार्यकर्त्यांची गर्दी..

कणकवली दि.१४ जानेवारी(भगवान लोके)

महायुती मधील पक्षांची या जिल्ह्यात मोठी ताकद आहे,आपल्या सर्वांसाठी २०२४ वर्षे फार महत्त्वाचे आहे.भारत देश महासत्ता कसा बनेल,या साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत.भारत देशामध्ये एकच गॅरंटी चालते ती म्हणजे नरेंद्र मोदी यांचीच गॅरंटी चालते. अयोध्या मध्ये राम मंदिर होत आहे,हे आपले भाग्य आहे. कोणाशीही बोलताना मोदी यानी काय काम केलं हे सांगायचे.आपल्या समोर लढण्यासाठी कोण आहे का? आपण ज्यावेळी प्रामाणिकपणे काम करु तेव्हा पुढच्या निवडणुकीत आमच्याशिवाय कोणीही जिंकू शकत नाही.काँगेस चे मिलिंद देवरा हे शिवसेनेत प्रवेश करीत आहेत,हे राहुल गांधी यांचे अपयश आहे.गेली दहा वर्षे निवडून दिलेला खासदारांने काय केले? विनायक राऊत यांचा कलंक लागलेला आहे .तुम्ही अमिषाला बळी पडू नका.निवडणुकीच्या काळात स्वतः ला समजून काम केले पाहिजे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्याग किती करायचा हे लक्षात घेण्याची गरज आहे.निधीची तडजोड होत नसल्याने काहीजण व्हाया प्रवेश करीत आहेत. भाजपात नाही तर ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जातात.देवगड नगरपंचायत नगराध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश केला, मात्र दालनात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचाही फोटो आहे,मग आम्ही काय समजायचे ?आग्रे यांनी ही गोष्ट पाहण्याची गरज आहे,असा प्रश्न भाजपा नेते,आ.नितेश राणे महायुती मेळाव्यात उपस्थित केला.

 

 

कणकवली येथे महायुती जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे,शिक्षण मंत्री दीपक केसरकर,बालविकास मंत्री आदिती तटकरे,आ.नितेश राणे,माजी आ.राजन तेली ,माजी आ.अजित गोगटे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत ,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे,अशोक दळवी,बँक अध्यक्ष मनीष दळवी,कार्याध्यक्ष काका कुडाळकर, महिला शिवसेना जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर,महिला आघाडी अध्यक्षा संध्या तेरसे ,अविनाश चमणकर,सावळाराम अणावकर,संदीप वालावलकर,मनोज रावराणे,रणजित देसाई,संतोष कानडे,रुपेश पावसकर,संदीप मेस्त्री,सुरेश गवस,यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे म्हणाले,या लोकसभेचा खासदार सर्वाधिक मतांनी निवडून आणण्यासाठी आपण काम केलं पाहिजे.मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत लोकसभा जिकायची आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक म्हणाले,महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आपण एकत्र आलो.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विकास साधला जाईल.राणेंच्या माध्यमातून ३०० कोटी जिल्हा नियोजन आराखडा होईल.कोण उमेदवार महत्वाचं आहे.

प्रस्ताविक भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले,आजच्या मकर संक्रांती दिवशी मेळावा होत आहे.प्रत्येक पक्षाला आपली मते आहेत,पक्ष वाढविण्यासाठी काम करीत असतात.गेली १० वर्षात मोदींनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.या लोकसभेची सर्वाधिक मताधक्याने मोदींना खासदार निवडून आणयाचा आहे.महायुती मधील मोठ्या भावाची भूमिका आहे,त्यामुळे त्यागाची भावना ठेवावी.