वेंगुर्ला,दि.७ मार्च
इनरव्हील क्लब, वेंगुर्ला आणि लेडीज डॉक्टर क्रिकेट क्लब, वेंगुर्ला यांच्यातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दि. १० मार्च रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वेंगुर्ला कॅम्प येथे ‘पिक पॉवर‘चे आयोजन केले आहे. यामध्ये लिबू चमचा, धावणे १००, रस्सीखेच, सूर्यनमस्कार, बॅडमिटन, दोरी उडी, स्कॅन रेस आदी स्पर्धा होणार आहेत. यातील प्रथम तीन क्रमांकाला आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. इच्छुकांनी नावनोंदणी ९८२३११८७७८, ९४०४४४४२८२, ९४२०२६५४५० यांच्याकडे करावीत.