वेंगुर्ला,दि.७ मार्च
वेंगुर्ला तालुका स्कूल शाळा नं.१ या शाळेमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक, माता पालक समिती प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शाळेच्या समोर उभारलेल्या स्वागत कमानीसाठी याच शाळेचे माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, चार्टर्ड इंजिनिअर विवेक कुबल यांनी ५ हजार रूपयांची आर्थिक मदत केली. त्याबद्दल शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.