सावंतवाडी दि.७ मार्च
मनसेने आंबोली मध्ये जेवढी ताकद अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी लावली त्याच्या दसपट ताकद मनसे स्थानीक लोकांचे उद्योग धंदे वाचविण्यासाठी लावेल असा इशारा मनसेचे
जिल्हाध्यक्ष अँड अनिल केसरकर यांनी दिला आहे
आंबोली गावातील स्थानीक लोकांच्या वहिवाटीच्या जमीनी पैश्याच्या जोरावर बळकावून तिथे बांधलेल्या अनधिकृत इमारती प्रशासनाने भुईसपाट केल्या म्हणून पोटशूळ उठलेल्या काही जणांनी माथी भडकवण्याचा उद्योग सुरू केला असून सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन देवून आंबोली मुख्य घाट ते आजरा फाटा पर्यंत असलेल्या दुकानांवर ४८ तासात कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.
मुळात या मार्गावर असलेली सर्व दुकाने हि आंबोली गावातील स्थानिकांची आहेत. या टपऱ्या व दुकानांवर लोकांची रोजीरोटी अवलंबून आहे. या स्थानीक ग्रामस्थांना धमकावण्याचा व त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास मनसेने जेवढी ताकद अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यासाठी लावली होती त्याच्या दसपट ताकद स्थानिकांचे रोजगार वाचावेत यासाठी लावेल,असा इशारा अँड केसरकर यांनी दिला.
आंबोली, चौकूळ व गेळे या तीन गावातील कबुलायत गावकर हा प्रलंबित असलेला प्रश्न लवकर सुटावा यासाठी सत्ताधारी यांनी प्रयत्न करणे आवश्यक असताना ते न करता उलट त्यांच्या जमिनींवर डोळा ठेवणाऱ्या व प्रशासनाकडे उलट सुलट निवेदने देवून स्थानिकांना कोण त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर मनसे पूर्ण ताकदीने स्थानिकांच्या बाजूने उभी असेल असा इशारा जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी दिला आहे.