पवनचक्की गार्डन येथे पर्यटन वाढी बरोबर धार्मिक वृत्ती वाढीस लागणार-आम.नितेश राणे
देवगड, दि .७ मार्च
देवगड तालुक्यात पर्यटनाला वाढता प्रतिसाद मिळत असताना देवगड पवनचक्की गार्डन हे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.या गार्डन मध्ये भगवान शंकराची मूर्ती विराजमान झाल्याने पर्यटना बरोबर धार्मिक वृत्तीही वाढीस लागणार
असून या परिसरात पर्यटकांचा ओघ वाढणार आहे.त्याचबरोबर या परिसरातील छोटे व्यावसायिक ,यांच्या व्यवसायात आर्थिक समृद्धी येणार आहे पर्यटनाच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबविले तर निश्चित येथील या भागाचा पर्यटन विकास वाढीस लागणार आहे.या पुढील काळात येथील अन्य उपक्रम पूर्णत्वास नेण्याकरिता ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. असे प्रतिपादन आम.नितेश राणे यांनी देवगड पवनचक्की गार्डन येथे बोलताना केले.
देवगड (प्रतिनिधी)
देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील पवनचक्की गार्डन याठिकाणी आम.नितेश राणे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या १५ फुटी आसनस्थ भगवान शंकर मूर्तीचे अनावरण आम.नितेश राणे यांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ फोडून करण्यात आले.
या वेळी भाजप सरचिटणीस संदीप साटम,बाळ खडपे,प्रकाश राणे,युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम, जिल्हा उपाध्यक्ष सौ प्रियांका साळसकर जिल्हा योगेश चांदोस्कर महिला अध्यक्ष उशकला,केळुसकर,तन्वी शिंदे,उपनगराध्यक्ष सौ.मिताली सावंत,माजी नगराध्यक्ष गटनेते नगरसेवक शरद ठुकरूल,विश्वामित्र खडपकर,नगरसेविका तन्वी चांदोस्कर,आद्या गुमास्ते,प्रणाली माने,ऋचाली पाटकर,माजी नगरसेविका प्राजक्ता घाडी,शहर अध्यक्ष दयानंद पाटील,योगेश पाटकर,वैभव करंगुटकर,मिलिंद माने,व अन्य भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
: थर्माकोल व प्लॅस्टर ऑफ पॅरिस चा वापर करून ही आकर्षक भगवान शंकराची मूर्ती बनविण्यात आली आहे.