मालवण,दि .७ मार्च
शालेय जीवनात स्पर्धा परीक्षा या अतिशय महत्वाच्या असतात. अधिकाधिक परीक्षामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. याच परीक्षा भविष्यात एमपीएसी, युपीएससी परिक्षांची पायाभरणी ठरतात, असे प्रतिपादन मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा प्रशासक आत्मज मोरे यांनी मालवण येथे शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केले.
पंचायत समिती मालवण (शिक्षण विभाग) सामग्र शिक्षा अभियान अंतर्गत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२२- २०२३ बक्षीस वितरण तसेच दिव्यांग विद्यार्थी साहित्य साधन वितरण कार्यक्रम मालवण शिक्षण विभागाच्या रघुनाथ देसाई विद्यालय सभागृह येथे संपन्न झाला. यावेळी गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांच्यासह गटशिक्षणाधिकारी संजय माने, विस्तार अधिकारी उदय दीक्षित, केंद्र प्रमुख श्री. गोसावी, विषय तज्ञ गौरी नार्वेकर, आरती कांबळी, ममता जोगल, विशेष तज्ञ विकास रुपनर, स्वप्नील पाटणे, हनुमंत तावडे, महेश चव्हाण, नितीन पाटील वरिष्ठ सहाय्यक वैभव वाघाटे यांसह शिक्षण विभाग व समग्र शिक्षा अभियान सर्व कर्मचारी, पालक उपस्थित होते.
गटविकास अधिकारी आत्मज मोरे संवाद साधताना पुढे म्हणाले, विध्यार्थी गुणगौरवर होत असताना तो प्राधान्याने त्या विध्यार्थ्यांच्या शाळेत झाल्यास इतर विध्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते. सोबत त्या विध्यार्थ्यांसाठीही तो सन्मान विशेष ठरतो. असे त्यांनी सांगितले.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विध्यार्थी प्रथम, राजवीर हनुमंत आखाडे (शाळा शिरवंडे बामणीये), द्वितीय, लेईशा नारायण पराडकर (रेवतळे मालवण), तृतीय, काव्या अभिमन्यु मेस्त्री (कुणकावळे) इयत्ता सातवी प्रथम समृद्धी विलास सरनाईक (नांदरुख आंबडोस), द्वितीय श्रेया प्रदीप मगर (मसुरे नं १), लतिका दीपक सावंत (गोळवण नं १) या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. यांसह गौरी सुनील काळसेकर (काळसे हायस्कुल), चैतन्य दत्ता चव्हाण (भंडारी हायस्कुल), ज्यूली पंकज आचरेकर (आचरे नं. १), अमर चंद्रकांत गावडे (चौके हायस्कुल), ईशा समीर कोंडूसकर (आर. पी. बागवे हायस्कुल मसुरे), प्रगती महेश पाताडे (निरोम नं. १) या सहा दिव्यांग विद्यार्थ्यांना प्राप्त साहित्य पालक, शिक्षक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी केले तर सूत्रसंचालन गौरी नार्वेकर यांनी केले.