काजूला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी १० मार्च रोजी दोडामार्ग येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा

दोडामार्ग, दि. ७ मार्च

दोडामार्ग तालुक्यातील काजू बागायतदार शेतकरी यांची बैठक फळबागायतदार संघटना अध्यक्ष विलास सावंत यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग गणपती मंदीर येथे पार पडली. या बैठकीत राज्य सरकार लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही नाही नाराजी व्यक्त केली. काजूच्या दरात घसरण होत आहे त्यामुळे रस्ता रोको आंदोलन करून सरकारला जाग आणण्यासाठी १० मार्च रोजी दोडामार्ग गांधी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात दोडामार्ग तहसीलदार पोलिस निरीक्षक याना निवेदन देण्यात आले
दोडामार्ग सावंतवाडी तालुक्यातील काजू बागायतदार शेतकरी यांच्या काजूला किलो ११५ रूपये एवढा अल्प दर दिला जात आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. वारंवार मागणी करून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सरकार लक्ष देत नाही त्यामुळे आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
यावेळी विलास सावंत, प्रविण परब, लक्ष्मण नाईक, राकेश धर्णे, चंद्रशेखर देसाई, आकाश नरसुले, संतोष देसाई,
राजेंद्र गवस, दत्तात्रय गंवडे, अरविंद गवस, दिपक नाईक, भिमराव देसाई, अरूण देसाई, चेतन देसाई इतर शेतकरी उपस्थित होते.