पालकमंत्र्यांना वेळ नसेल तर आम्ही शिवसेनेतर्फे ज्येष्ठ नागरिकांकडून या इमारतीचे उद्घाटन करून घेऊ-अतुल रावराणे

वैभववाडी,दि.७ मार्च
वैभववाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी होणार होते,  मात्र पालकमंत्र्यांना उद्घाटनाला वेळ नसल्यामुळे ते पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांकडे वैभववाडीचे पालकत्व आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकमंत्र्यांना वेळ नसेल तर आम्ही शिवसेनेतर्फे ज्येष्ठ नागरिकांकडून या इमारतीचे उद्घाटन करून घेऊ असा इशारा शिवसेनेचे नेते अतुल रावराणे यांनी दिला आहे.
वैभववाडी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पञकार परिषदेत रावराणे बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते सतीश सावंत, युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख मंगेश लोके, स्वप्नील धुरी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रावराणे म्हणाले वैभववाडी पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे काम केले दहा-बारा वर्ष सुरू असून, नवीन इमारतीच्या प्रस्तावित कामांना निधी मिळाल्यानंतर इमारत उद्घाटनाच्या  काही महिने प्रतीक्षेत आहे. ८  मार्च रोजी इमारतीचे उद्घाटन  पालकपत्रांच्या हस्ते  होणार अशी वैभववाडी मध्ये चर्चा सुरू होती. त्यामुळे अखेर इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला असे बोलले जात असतानाच पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च होऊन ही इमारत विनावापर पडून आहे. शासनाकडून जर उध्दघाटन वेळेत होणार नसेल तर आम्ही शिवसेनेचेच्यावतीने जेष्ठ नागरीकांच्या हस्ते उध्दघाटन करु असा इशारा रावराणे यांनी दिला आहे.