माजी नगरसेवक व नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा संघ विजेता

0

सावंतवाडीतील पत्रकारांचा संघ उपविजेत्या चषकाचा मानकरी ठरला

सावंतवाडी दि.१४ जानेवारी
जिमखाना मैदानावर माजी नगरसेवक, नगरपरिषद कर्मचारी आणि पत्रकार यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यात माजी नगरसेवक व नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा संघ विजेता ठरला. विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात आलं. तर सावंतवाडीतील पत्रकारांचा संघ उपविजेत्या चषकाचा मानकरी ठरला अंतिम सामन्यात दोन्ही संघांत अतितटीची लढत झाली. यात ६१ धावांचा पाठलाग करताना माजी नगरसेवक व नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या संघानं विजय खेचून आणला.

युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते व माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या उपस्थितीत या सामन्यांना प्रारंभ झाला. यावेळी विशाल परब यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी थेट मैदानात उतरत फटके मारले. यानंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या. त्यांनी देखील क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. एकुण सहा षटकांचे हे सामने रंगतदार ठरले. सुरुवातीला पत्रकार, माजी नगरसेवक व नगरपरिषद कर्मचारी यांच्यात एकुण चार सामने खेळवले गेले‌. यातील विजेते संघ अंतिम फेरीत धडकले. अंतिम फेरीत पत्रकारांच्या संघाने ६१ धावांच लक्ष प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं होतं. यावेळी फलंदाजी करताना माजी नगरसेवकांच्या संघानं जोरदार फटकेबाजी केली. षटकारांचा पाऊस जिमखाना मैदानावर पाडला. अतिटीच्या या सामन्यात शेवटच्या षटकात माजी नगरसेवकांच्या संघानं विजय प्राप्त केला.

याप्रसंगी उपस्थित माजी नगरसेवक, पत्रकार यांसह माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बबन साळगावकर म्हणाले, पत्रकार आणि माजी नगरसेवकांच एक वेगळं नात आहे. समाजात कार्यरत असणाऱ्या पत्रकार मित्रांना विरंगुळा मिळावा अन् कामामुळे मैदानापासून दुरावलेल्या पत्रकारांना पुन्हा मैदानात उतरवण्यासाठी एकदिवसीय सामन्यांच आयोजन करण्यात आलं होतं. या सामन्यांचा युवा पत्रकारांसह ज्येष्ठ पत्रकारांनीही आनंद लुटला. मैदानी खेळाचा आनंद पत्रकारांसह लुटता आला असं मत बबन साळगावकर यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व माजी नगरसेवकांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आलं. यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांना गौरविण्यात आलं. तर पत्रकार सचिन मांजरेकर यांना सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून सन्मानित करण्यात आलं. सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून न.प.आरोग्य विभागाचे दीपक म्हापसेकर यांना सन्मानित करण्यात आल. मालिकाविर किताब न.प. कर्मचारी निखिल कांबळे यांना प्रदान करण्यात आला. उपविजेत्या चषकावर पत्रकारांच्या संघानं तर विजेत्या संघावर माजी नगरसेवकांच्या संघानं नाव कोरल.

यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, उमाकांत वारंग, अफरोज राजगुरू, शिप्रा सावंत, सुरेश भोगटे, शुभांगी सुकी, किर्ती बोंद्रे, दीपाली पटेकर, बाबु कुडतरकर, साक्षी कुडतरकर, उमेश कोरगावकर, राजू बेग, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, सिताराम गावडे,अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, अनंत जाधव, संतोष सावंत, प्रवीण मांजरेकर, राजू तावडे, हर्षवर्धन धारणकर, वैशाली खानोलकर, नंदू मोरजकर, विनायक गांवस, अमोल टेमकर, भुवन नाईक, आनंद धोंड, शैलेश मयेकर, प्रा. रुपेश पाटील, विजय देसाई, राजेश नाईक, प्रवीण परब, जतीन भिसे, रुपेश हिराप, राजाराम धुरी, संतोष मुळीक, मयूर चराटकर, दीपक गांवकर, रामचंद्र कुडाळकर, प्रशांत मोरजकर, संजय पिळणकर, लक्ष्मण आढाव, पालिका कर्मचारी भाऊ भिसे, दीपक महापसेकर, गजानन परब, निखिल कांबळे, महेश सावंत, दिलीप सावरवाडकर, नारायण पिंगुकळर, श्री. भोसले आदी उपस्थित होते.