आ.नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केला प्रवेश
देवगड दि.७ मार्च
देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी येथील ग्रामपंचायत मध्ये अडीच वर्षांनी सत्तांतर झाले आहे. उबाठा सेनेच्या देवगड मालभाटी येथील माजी उपसरपंच व विद्यमान सदस्या श्रीमती सायरा मुल्ला यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे.आ.नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
यापूर्वीच या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उदय पाळेकर हे बहुमताने निवडून आले होते. यावेळी सायरा मुल्ला यांनी त्यांना मतदान केले होते.त्यानी भाजपामध्ये अधिकृत प्रवेश घेतला आहे.पाळेकरवाडी ग्रामपंचायत भाजपाच्या झेंड्याखाली आल्याने ग्रामपंचायत मधील उबाठा गटाची सत्ताही संपुष्टात आली आहे.
त्यांच्या समवेत अकबर हारून मुल्ला, शायरा अकबर मुल्ला, जुबेद अकबर मुल्ला, शायरा अकबर मुल्ला, अफ्रीन जुबार मुल्ला, मसीरा शोएब मुल्ला, मुराद जाफर मुल्ला, खातून मुराद मुल्ला, रफिक मुराद मुल्ला, फइम मुराद मुल्ला, नईम मुराद मुल्ला, जरीना रफिक मुल्ला, नुरजहा फयीम मुल्ला, अफ्रीम नईम मुल्ला, साबिरा गफार मुल्ला, आशिया गफार मुल्ला, अनिस गफार मुल्ला, मुमताज रशीद शेख, नजमा मुल्ला, शबनम अश्रफ ठाकूर ,रुबिया जाफर मुल्ला, व शेकडो मुस्लिम बांधवांनी ,नागरिकांनी प्रवेश केला आहे.