कणकवलीत कल्याण मटका नावाने खेळल्या जाणाऱ्या अवैध धंद्यावर पोलिसांची कारवाई

कणकवली दि .७ मार्च(भगवान लोके)

कणकवली एसटी स्टँड समोरील कल्याण मटका नावाने खेळल्या जाणाऱ्या अवैध धंद्यावर पोलिसांनी कारवाई करून १६७० रुपयाची रक्कम जप्त केली. कल्याण मटका स्वीकारताना मिळून आल्या प्रकरणी नारायण वसंत सवादे (५३ रा. पटकीदेवीनजीक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे,पोलीस उपनिरीक्षक रविंद्र शेगडे, कॉन्स्टेबल राज आघाव, किरण मेथे यांनी केली.