कुडाळ येथील चित्रकार व पत्रकार रजनीकांत कदम यांनी महाशिवरात्रीच्या औचित्याने साकारले प्रसिद्ध श्री देव कुणकेश्वर मंदीराचे विलोभनीय चित्र.

कुडाळ,दि .७ मार्च(विठ्ठल राणे)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व देवगड तालुक्यातील प्रसिद्ध व जागृत असलेल्या श्री देव कुणकेश्वर महाराज यांच्या मंदीराचे विलोभनीय चित्र कुडाळ येथील चित्रकार व पत्रकार रजनीकांत कदम यांनी महाशिवरात्रीच्या औचित्याने रेखाटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री साजरी केली जाते. सर्व मंदीरा मध्ये विविध धार्मिक,  सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथे श्री देव कुणकेश्वर महाराज यांचे प्राचीन मंदीर आहे. या ठिकाणी ही भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो. मोठ्या संख्येने भाविक भक्तगण श्रींचा आशिर्वाद घेण्यासाठी येतात.
या महाशिवरात्रीचे औचित्य साधून चित्रकार रजनीकांत कदम यांनी श्री देव कुणकेश्वर मंदीराचे विलोभनीय चित्र साकारले आहे. चित्रकार रजनीकांत कदम यांच्या या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.