आनंदवाडी जेटी मार्गावर “हर हर महादेव “हा फलक चर्चेचा विषय बनला…

भाजपा पदाधिकाऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त…

देवगड,दि.८ मार्च

देवगड येथे नगरपंचायतीच्या माध्यमातून आमदार राणे यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य गार्डनची निर्मिती करण्यात आली यातूनच देवगडच्या पर्यटनात आणखीनच भर पडली आहे.आठ मार्च रोजी होऊ घातलेल्या महाशिवरात्रीचे अवचित्य साधून आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून 15 फुटी शंकर महादेवाचे आसनस्थ मूर्ती उभारण्यात आली आहे.याचे लोकार्पण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले असून देवगड एसटी स्टॅन्ड ते देवगड बाजारपेठ निपाणी मार्गावरील देवगड आनंदवाडी जेटी मार्गावर “हर हर महादेव “हा फलक देवगड परिसरात लावल्याने नागरिकांमधून उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.मात्र हा बॅनर कोणी लावला ते अद्यापही कळू शकले नसले तरी भाजप पदाधिकाऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

या फलकावर नमूद केल्या प्रमाणे देवगड गार्डन मध्ये महादेवाची मूर्ती उभारली आनंद झाला.पण हीच मूर्ती कुणकेश्वरला उभारली असती तर अजून आनंद झाला असता आता खास करून महिला वर्गाने आपण गार्डन मध्ये नाही तर मंदिरात जातो आहे याचे भान ठेवून पावित्र्य राखावे.असे लिहिले आहे .व यात टीप मध्ये देवाला त्याच्या दारात ठेवा नाहीतर देव तुम्हाला तुमची जागा दाखवील ,असे सूचित केले आहे.”हर हर महादेव.”असे लिहिले असे कृत्य करणाऱ्या विरोधात भाजप पदाधिकाऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.