हर हर महादेवच्या जयघोषात कुणकेश्वर यात्रेस प्रारंभ….

महाशिवरात्रीनिमित ‘हर हर महादेव’च्या जयघोषात हजारो भाविकांनी घेतले कुणकेश्वराचे दर्शन

देवगड
दक्षिण कोकणची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा उत्सवास शुक्रवारी मध्यरात्री उत्साहात प्रारंभ झाला.रात्री १२ वाजले नंतर देवस्थानचे पुजारी ,मानकरी यांच्या हस्ते श्री देव कुणकेश्वराची पूजा झाल्यावर प्रथम निमंत्रण पूजा मान रत्नागिरी येथील उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या हस्ते पूजा पार पडली.त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री नाम.दीपक केसरकर,सुधीर जाधव,सौ स्नेहल जाधव,अतुल रावराणे देवगड नगराध्यक्षा साक्षी प्रभू,गटविकास अधिकारी वृक्षाली यादव,यांनी पूजा करून दर्शन घेतले. या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे,तालुका प्रमुख विलास साळसकर,अमोल लोके, नगरसेवक विशाल मांजरेकर,रोहन खेडेकर घेतले.त्यानंतर आरती झालेवर मंदिर भाविक शिवभक्त याना दर्शनाकरिता सुरुवात झाली.श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ,श्री देव कुणकेश्वर प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.तसेच
या महाशिवरात्री निमित्त श्री देव कुणकेश्वर चरणी संस्थापक सिंधु संजीवन संस्था देवगड मधील पहिल्या महिला ढोल ताशा तेजस्वी ढोल ताशा पथकाने उपस्थित मान्यवर व शिवभक्त यांना बहारदार वादन करून मानवंदना दिली.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर्व महिला ढोल ताशा पथकाला शालेय शिक्षण मंत्री नाम.दीपक केसरकर ,उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत,अतुल रावराणे यांनी कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या.