दोडामार्ग, दि.१४ जानेवारी
गेले काही दिवस तिलारी खोर्यामध्ये हत्तींचा धुमाकूळ सुरू असून शेतकरी हैराण झालेले असतानाच रविवारी मोर्ले घोटगेवाडी परिसरात हत्ती दाखल झाले असून त्यांनी केळी बागायतींचे नुकसान केले आहे.हत्तींच्या कळपाने घाटीवळे, बांबर्डेनंतर आपला मोर्चा मोर्ले परिसराकडे वळविला आहे. रविवारी येथील केळी बागायतींमध्ये घुसून हत्तींनी झाडे मुळासकट उपटून टाकली आहेत. शासनाने कायमस्वरुपी हत्तींबाबत तोडगा न काढल्याने हे नुकसान वाढत चालले आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे.