फोंडाघाट जि. प. मतदार संघात युवासेनेचा गावदौरा

लोरे, घोणसरी, वाघेरी गावात घेतल्या गावदौरा बैठका

फोंडाघाट,दि.८ मार्च(संजय सावंत)
युवासेनेच्या माध्यमातून खासदार विनायक राऊत यांना मताधिक्य मिळून देण्यासाठी कणकवली विधानसभा मतदार संघात युवासेना अक्शन मोड वर आली असून युवासेने तर्फे “निर्धार मताधिक्याचा गावादौरा सुसंवादाचा” च्या माध्यमातून युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक हे गावोगावी जाऊन गावादौरा बैठका घेत आहेत यातून प्रत्येक गावातून या गावादौरा बैठकांना उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे.
आज फोंडाघाट जि. प. परिषद मतदारसंघातील लोरे, घोणसरी, वाघेरी या गावात बैठका संपन्न झाल्या. यावेळी गावातील नागरिकांना युवासेना जिल्हाप्रमुख नाईक यांनी मार्गदर्शन केले. गावातील जनतेमधून खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या विकासकामांची पोच पावती मिळत आहे.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासोबत युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे, राजू रावराणे, चंदू रावराणे, निलेश रावराणे, gnesh देऊलकर, प्रितम राणे, प्रकाश गुरव, सत्यविजय रावराणे, महेश मांडवकर, कृष्णा एकावडे, दर्शन मराठे,दीपक राणे, विजय मराठे, सचिन सुतार, महेश येंडे, संदीप सुतार, दत्तारय राणे, पंकज राणे, अनुजा राणे, तुकाराम गुरव, प्रकाश वाघेरकर, प्रकाश मोंडकर, मंगेश नेवगे आधी ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.