लोकसभेसाठी मी इच्छुक पण वरीष्ठ देतील त्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणणार–किरण सामंत

आचरा,दि.८ मार्च(अर्जुन बापर्डेकर)

लोकसभेसाठी शिवसेने तर्फे मी उमेदवार म्हणून इच्छुक आहे.मात्र वरीष्ठ रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघासाठी जो उमेदवार देतील तो महायुतीचा उमेदवार म्हणून भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत शिवसेना नेते व उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांनी आचरा व्यक्त केले. महेश राणे मित्रमंडळातर्फे आचरा मांगल्य मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, उपाध्यक्ष विश्वास गावकर, मालवण तालुका प्रमुख महेश राणे,रुपेश पावस्कर,सुकांत वरुणकर,भास्कर राणे, ,रुतीक सामंत,श्रीमतीपाटकर,शेखर राणे, किशन मांजरेकर,चंद्रकांत गोलतकर, अवधूत हळदणकर,रियान मुजावर, अश्विन हळदणकर,नाबर, महेंद्र घाडी किशोर तोडणकर यांच्या सह शिवसेना कार्यकर्ते, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना सामंत यांनी नारायण राणे मुख्यमंत्री असताना एका कामासाठी घेतलेल्या भेटीत राणेसाहेबांचा स्पष्टपणा भावला होता.त्यांचाच आदर्श घेऊन काम करत आहे.दुसरयाच्या चांगल्या गोष्टीं घेऊन पुढे गेलो तर त्याचा आयुष्यात चांगला फायदा होतो.असे सांगितले.यावेळी उपस्थितांनी किरण सामंत यांचा खासदार म्हणून केलेल्या उल्लेखाचा संदर्भ घेत आपण खासदारकी साठी शिवसेना पक्षाकडून इच्छूक आहे.मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे,देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रविंद्र चव्हाण जो उमेदवार रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघासाठी देतील तो भरघोस मतांनी निवडून आणण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी सर्जेकोट मिर्यांबांद येथील ग्रामस्थांनी किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रवेश केला.यावेळी किशोर तोडणकर , मच्छीमार बांधव, मुझफ्फर मुजावर मित्र मंडळ,,पारवाडी,पळसंब बांदिवडे आचरा हिर्लेवाडी येथील ग्रामस्थांनी भैय्या सामंत यांचा सत्कार केला.