मुंबईस्थित चाकरमान्यांची १३ मार्चला शिवसेना भवनात बैठक ; वरवडे गावातूनच मुस्लिम समाजाने राणे यांच्यापासून फारकत घेतली
कणकवली दि.८ मार्च(भगवान लोके)
नितेश राणे हे बाडगा अधिक कडवा आहेत,भाजपाच्या हिंदुत्वाची सगळीच जबाबदारी मीच घेतली,असे नितेश राणे भासवत आहेत.हे सगळे मंत्रिपदासाठी नितेश राणेंचे नाटक आहे.त्यामुळेच त्यांच्याच वरवडे गावातून मुस्लिम समाजाने राणे यांच्यापासून फारकत घेतली आहे.जिल्ह्यात आले की मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमांमध्ये आणि घरी जातात,तर कोल्हापूर सीमा चढून वरती गेले की मुस्लिम समाजाचे दर्गे पाडण्याची भूमिका नितेश राणे घेत आहेत,ही सगळी त्यांची नौटंकी आहे,हे नितेश राणे म्हणजे नेमके काय आहेत? हे जनतेला कळून चुकले असल्याचा टीका शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली.
कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,अनुप वारंग आदी उपस्थित होते.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे खा.विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कोकणातील मुंबईस्थित चाकरमान्यांचा मेळावा १३ मार्च ला मुंबई येथे शिवसेना भवन कार्यालयात सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.कालच राणेंच्या वरवडे गावातील मुस्लिम बांधव खा.विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत आले आहेत.खा.विनायक राऊत यांच्या समोर उमेदवार कोण आहे? अजून निश्चित नाही.त्यामुळे नारायण राणे राहिले तरी कोणताही फरक पडणार नाही.लोक महागाईने त्रस्त झाले आहेत.त्यामुळे लोकांना आता केंद्रात बदल आवश्यक आहे.नारायण राणे जर उमेदवार असतील तर ही निवडणूक एकतर्फी होवून विनायक राऊत निवडून येतील,असा विश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यात सभा घेत आहेत. लोकांचा प्रतिसाद लाभत आहे,आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांना नामोहरम करण्यासाठी श्री.ठाकरे काम करीत आहेत.खा.विनायक राऊत लोकांना भेटण्यासाठी गावोगावी जात आहेत.सत्तेच्या विरोधात लोक दिसून येत आहेत.त्यामुळे विजयाची हॅट्रिक करत खा.विनायक राऊत तिसऱ्यांदा लाखोंच्या मतदानाने निवडून येतील,असेही श्री.पारकर म्हणाले.
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले,आमच्या उमेदवारांची प्रचाराची सुरुवात झाली आहे. अडिज लाखांच्या फरकाने l खा.विनायक राऊत निवडून येतील.कणकवली विधानसभा मतदारसंघात देखील चांगले मताधिक्य असेल.आम्ही जनतेसाठी कामे केली आहेत.आम्ही गावात गेल्यावर लोक सांगताहेत लेखा जोखा खासदारांनी मांडायची गरज नाही.विकास कामांच्या जोरावर विनायक राऊत निवडून येतील.आम्ही युवासेनाची बांधणी या मतदारसंघात केली आहे,विविध जनतेचे प्रश्न घेवून आंदोलने केली आहेत,त्याचा फायदा या निवडणुकीत होईल.